प्रतिसादाबद्दल आणि मोकळेपणाने तुमचे म्हणणे माझ्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
न्यूयॉर्क हे जगातील एक प्रमुख शहर असून त्याचे जागतिक राजकारण, अर्थकारण, जागतिक प्रतलावरील उलाढाली, निर्णय आणि त्यांचे परिणाम, व्यापार इ. मधील स्थान वादातीत आहे. इतकेच नाही, तर ते इतिहास आणि संस्कृती यांच्या अभ्यासाचेही एक प्रमुख केंद्र आहे. म्हणूनच त्याला 'जगाची राजधानी' ही 'पदवी' (;) बहाल करण्यात आली असावी. खुद्द न्यूयॉर्क शहरात त्याची 'जगाची राजधानी' अशी जाहिरात होते. बाकी ती अमेरिकेचीच काय तर न्यूयॉर्क राज्याचीही राजधानी नाही, या टगोजींच्या माहितीशी पूर्ण सहमत आहे.
माझ्या लेखाला साहित्यिक मूल्य आहे का, असल्यास किती इत्यादी चर्चेसाठी माझे भारावले असणे अगर नसणे हा पूर्ण गैरलागू मुद्दा आहे असे मला वाटते. त्यामुळे अशी चर्चा करण्याची पूर्ण मुभा (किंवा अधिकार) एक वाचक म्हणून तुम्हाला नक्कीच आहे.
पुन्हा एकदा आभार.