लेख खरंच खूप धमाल लिहिला आहे!!! अशी कुचंबणा (पोपट) माझी ही बऱ्याचदा
झाली आहे काकांकडून, खरतरं आम्ही काकांना 'पांडू'चं म्हणतो.
त्याच झालं असं की दिवाळीच्या
खरेदीसाठी आम्ही मित्र आपापल्या
दुचाकी घेऊन
हाजीअलीजवळील हिरापन्ना ह्या
बाजारात गेलो होतो. वरळीनाक्याच्या
थांब्याजवळ कसलीशी तपासणी सुरू होती. आम्ही आपल्याच नादात आणि आम्हाला कोण
अडवणार ह्या भ्रमात चाललोच होतो तेवढ्यात एका पांडूने आमच्यातील एकाला अडवलं. आम्ही सोबत म्हणून त्याच्या बरोबर थांबलो. आणि म्हणतातना कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं तीन(३) ताऱ्याचं
आमच्या संघावर
लक्ष्य गेलं. त्यानं आम्हा सर्वांनाच आपल्या गोठात बोलावलं.
त्यांनी
चालक-परवाना मागताच माझा हात खिशाला गेला आणि
मी
उडालो. पण माझ्या
जोडीदाराने आपला परवाना साहेबांच्या हाती दिला. तेव्हड्यात पांडू पचकला, म्हणे गाडीस्वार हा नव्हता.
ताऱ्याने आम्हाला पकडलं आणि पांडूच दिवाळी
गिफ्ट हातचं गेलं ह्याचा राग आला
होता त्याला बहुतेक झालं आता साहेब काय करताहेत हे समजे पर्यंत
ढढामं झालं.
accident हो गया रब्बा-रब्बा... आणि आम्ही सुटलो म्हणजे दुचाकीवर सुद्धा
सुटलो...