तिंबूनाना,

त्याकाळी सर्वसामान्यांची मराठी भाषा कशी होती? आजच्यासारखी खचीतच नसणार. चित्रपटांमध्ये जी ग्रामिण भाषा म्हणुन आपण एकतो ती त्यावेळी कशी होती? संस्कृतप्रचुर होती का? याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

या प्रश्नासाठी "मराठी भाषा: उगम व विकास" हे कृ. पां. कुलकर्णी यांचे पुस्तक उपयोगी पडेल. मात्र पुस्तक जुन्या काळातले (निदान ५० वर्षांपूर्वीचे )असल्याने त्याचा काही दुवा देता येईल का हे सांगता येत नाही. त्या पुस्तकात वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या प्रदेशातील, मुलांची, स्त्रियांची अशा वेगवेगळ्या प्रकारचे मराठीचे भाषाभेद सांगितले आहेत.

अवधूत.