मा. एकलव्य.
<हा सत्याचा अपलाप आहे, इतिहासाचा विपर्यास आहे. केवळ स्वार्थ / शुद्ध 'मिलिटरी स्ट्रॅटेजी' हीच पार्श्वभूमी या भारत-जर्मनी या विजोड विवाहास होती. हिटलर हा माथेफिरू होता, त्याच्या तथाकथित मर्दानगीची पातळी नेताजींच्या जातकुळीच्या जवळपासही पोहचणारी नव्हती. > चर्चेत आपल्याला सोयीचा पडेल असा अर्थ आपण काढला आहे. भारताला मदत हे जरी हिटलरचे लष्करी धोरण असले तरीही ते घेउन तो आपल्या दारी आला नव्हता तर आपल्याला मदत करणे कसे फायद्याचे हे नेताजींनी त्याला पटवून दिले होते. जर्मनीत पोहोचल्यावरही अनेक महिने हिटलरने नेताजींची साधी भेटही घेतली नव्हती, अखेर इथे वेळ वाया घालविण्यापेक्षा परत जाऊन इतरत्र प्रयत्न केलेले बर असा निर्धार नेताजींनी व्यक्त केल्यावर मग ही भेट झाली व नेताजींना पाठींबा मिळाला. यांत नेताजींचे कर्तृत्व झळकते. आता यांत मी नेताजी व हिटलर यांची तुलना कुठेही केलेले नसताना आपण सोयीचा असा विपरीत अर्थ काढला आहात.
<जीव घेण्याचे जणू औद्योगिकीकरण करून -- १/३ देशवासीयांना मारून टाकणारा हिटलर देशभक्तीने पेटला होता हे कसे म्हणणार?> क्रौर्य आणि देशभक्ती यांची झकास गल्लत केली आहेत आपण. हिटलर हा प्रखर राष्ट्राभिमानी होता हे नाकारता येत नाही. त्याने मनमानी केली, अनेक चुका केल्या, अमानुष हत्या केल्या तरीही समृद्ध, संपन्न जगज्जेता जर्मनी हे त्याचे ध्येय होते हे इतिहास सांगतो. त्याने संहार केला म्हणजे तो देशद्रोही हे तर्कट अजब आहे. त्याने संपूर्ण कारकिर्दित स्वतःची भरमसाठ मालमत्ता वा परदेशी बँकांमध्ये प्रचंड धनसंचय वगरे केल्याचे त्याच्या शत्रूनेही म्हंटलेले नाही.