सर्वसाक्षी महोदय -
सोयीचा अर्थ म्हणजे नेमके काय ते समजले नाही. माझे स्पष्ट म्हणणे इतकेच आहे -
- केवळ स्वार्थ / शुद्ध 'मिलिटरी स्ट्रॅटेजी' हीच पार्श्वभूमी या भारत-जर्मनी या विजोड विवाहास होती.
हे दोन्ही बाजूंनी खरे आहे. अधिक पुढाकार नेताजींकडून होता हे ही खरेच. कोण दारी आला याविषयी वाद नाहीच. मात्र भारतीयांविषयी प्रेम/आदर ही भावना हिटलरकडे बिलकुल नव्हती.
- क्रौर्य आणि देशभक्ती यांची गल्लत नाही. पण देशाचे भले त्यांतील १/३ जनतेला मारून कोणत्या व्याख्येत होते? ह्या १/३ तील निम्याहून अधिक ज्यूएतर होते. जे कमकुवत त्यांची संख्या कमी करणे म्हणजे मारणे हा नामी उपाय होता, त्याला मी देशभक्ती म्हणत नाही. ह्याला तर्कट कसे म्हणता येईल हे मला उमगत नाही.
त्याने स्वतःची भरमसाट मालमत्ता केलेली नसेल, पण म्हणजे वर सांगितलेला देशद्रोह केलेला नाही हे कसे म्हणणार? त्याने जातीयतेसह अनेक मुद्द्यांवर जर्मन देश तोडला.