असे निरीक्षण आहे की बहुतांशी भारतीय लोक एखाद्या, विशेषतः ऐतिहासिक, व्यक्तीला एखाद्या छापाने ओळखतात. कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती ही माणूस असते आणि गुणावगुणाने युक्त असते. तुमच्या-आमच्याप्रमाणे तिच्यातही गुण-कौशल्ये असतात तसेच अवगुण-कमतरता असतात.
हिटलर म्हणजे फक्त दुर्गुण, मो.क. गांधी म्हणजे फक्त सद्गुण, इंदिरा गांधी म्हणजे फक्त आणीबाणी, शिवाजी महाराज म्हणजे फक्त यश असे छाप (टाईपकास्टिंग) मारण्याची सवय बहुतांशी भारतीयांना आहे असे वाटते.
यापेक्षा मध्यम मार्ग स्वीकारावा असे वाटते. या ऐतिहासिक व्यक्तींचे गुण घ्यावेत आणि दुर्गुणांपासून दूर राहावे असे वाटते.
हिटलरमध्येही काही गुण होते, मो.क.गांधींमध्येही काही दुर्गुण होते, इंदिरा गांधी म्हणजे फक्त आणीबाणी नाही, शिवाजी महाराजांनाही अपयशाला तोंड द्यावे लागले होते...असे वाटते!
हंसाप्रमाणे नीरक्षीरविवेकबुद्धी वापरावी असे वाटते!