आदरणीय महेशराव,
द्वितीयक्रमांकप्राप्त खेळाडूने प्रथमक्रमांकप्राप्त खेळाडूचे गुणगान करणारा लेख लिहावा ही गोष्ट वातावरणातली निकोपता आणि मराठी भाषेच्या विकासासाठी असलेली आत्यंतिक तळमळ अत्यंत दिमाखात दर्शविते. सचिनरावांचे आणि आपलेही हार्दिक अभिनंदन.
त्याचवेळी वेधक पण भडक नाही, अशी नवी रंगसंगती, नवी रचना करण्यात सौ. अल्पना वेलणकर आणि चि. सलील वेलणकर ह्यांचे मार्गदर्शन आणि सूचना असे मोलाचे सहकार्य लाभले हे आवर्जून सांगावेसे वाटते. त्यांच्या मदती (आणि सहनशीलते)विना मनोगताचे काही काम करणे अतिशय अवघड आहे!
चला. आपल्याकडूनच वेलणकर कुटुंबीयांचे कौतुक झाले ही गोष्ट फार चांगली झाली. आपल्याला मोलाची साथ देणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचे हार्दिक कौतुक व आभार!
आपला
(हर्षभरित) प्रवासी
मनोगताबद्दल अल्पनावहिनी 'सवतचि भासे मला' असे काहीसे गुणगुणताना ऐकले हो परवा आम्ही ;-) हघ्याहीवि. हा हा हा.
आपला
(विनोदी) प्रवासी