अप्रतिम लेख. दै. लोकसत्तेत वाचला होता. येथे पुन्हा वाचून तेवढाच आवडला. आपली लहान-सहान आयुष्ये पुलकित करणाऱ्या या पुरुषोत्तमाला माझी नम्र श्रद्धांजली.
पु. लं. हॉस्पिटलमधे दाखल झालेत हे कळल्यावर पुणेकरांची तेथे रीघ लागली होती. त्या हॉस्पिटलच्या गेटबाहेर जमलेल्या गर्दीत एका दांपत्याने पु, लं. चे बहुधा शि. द. फडणीसांनी काढलेले अर्कचित्र आणि त्याखाली 'तुमने हमको हसना सिखाया' ही ओळ असा अतिशय बोलका फलक आणला होता. तुमचा लेख वाचून लोकसत्तेतच आलेल्या त्या फोटोची आठवण आली.