श्री. शरण्या!!

माझ्याकडे असलेली काही माहिती.

१. घर ज्या जमीनीवर (प्लॉट) बांधलेले आहे त्या जमीनीचा आकार चौकोनी अथवा आयताकृती असावा.
२. घराच्या (शक्यतो) कमीत कमी दोन बाजूंनी रस्ता असावा.
३. घराचे दार उत्तरेस अथवा पूर्वेस असावे. पश्चिमेस असले तरी चालेल. पण दक्षिण दिशेस नसावे. तसेच नैरूत्य कोपऱ्यात नसावे.
४. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे.
५. जर घराला स्वतःची गच्ची असेल तर ती उत्तर / नैरूत्य कोपऱ्यात असावी.
६. घराच्या उत्तर दिशेस पाण्याचा प्रवाह / साठा असावा.
७. घर अंधाऱ्या जागेत नसावे.
८. घर वाईट जागेजवळ (स्मशान इ.) नसावे. जर असेल तर घरातून / घराजवळून ते दिसणार नाही अशी व्यवस्था असावी.

घराच्या आतील काही गोष्टीः

१. देवघर ईशान्य दिशेस असावे.
२. घराचे दार आतल्या बाजूस उघडणारे असावे. तसेच ते पूर्णपणे उघडणारे असावे.
३. घरातील दारे हालवताना आवाज येऊ नये.
४. शौचालय शक्यतो पश्चिमेस असावे.


लक्षात घेण्याच्या काही व्यावहारिक बाजूः
१. घर हे शहराच्या मध्यवर्ती असावे. जर किमतीत परवडत नसेल तर किमान मध्यवर्ती भागाला जवळ असेल व वाहतुकीची चांगली सोय असावी.
२. किमान पुढील १०-१५ वर्षे, त्याकाळात आजूबाजूची होणारी संभाव्य वाढ, आपल्याला लागणाऱ्या गरजा यांचा विचार करावा.
३. मुलांच्या शाळा, कॉलेज, आपले ऑफिस, येण्याजाण्याला लागणारा वेळ, त्यासाठीचा खर्च (पेट्रोल इ.) यांचा विचार करावा.
४. जर घरी थांबणार कोणी असेल (नसेल तरीही) उदा. बायको, वयस्क व्यक्ती यांची सुरक्षितता, शेजार, अचानक उपयोगी येतील अशी माणसे, दवाखाने हे सहज उपलब्ध होतील हे पाहावे.

आजच्या जमान्यात वास्तुशास्त्राने पूर्ण असे घर मिळणे अवघड आहे. त्यामुळे थोडीफार तडजोड करून व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर घर घेणे उचित ठरेल.

वरील माहिती ही माझ्याकडच्या त्रोटक ज्ञानानुसार आहे. चू. भू. द्या. घ्या.
आणखी काही माहिती मिळाली तर कळवीनच.