मा. भोमेकाका,

आपला संतुलीत दृष्टीकोन एकदम मान्य. अनेकदा आपण म्हणता त्याप्रमाणे एखादे व्यक्तिमत्त्व हे एखाद्या विशिष्ठ गुण वा अवगुणामुळेच ओळखले जाते. मात्र जे गुण आहेत वा दोष आहेत ते नाकारणे वा त्याचा विरोध करण्यासाठी कुणाशी तुलना करणे म्हणजे झापड लावून घेण्यासारखे आहे. या चर्चेत अनेकांनी असा सूर आळवला आहे की इथे हिटलरची स्तुती होत आहे. मुळात चर्चेच्या प्रस्तावानुसार पाहीले तर कुणीही हिटलरला नायक म्हंटलेले नाही मात्र त्याचे ठायी काही गुण होते हे नमूद केले आहे. सुरुवातीलाच नंदन यांनीही असाच संतुलीत दृष्टीकोन मांडला होता.