दक्षिणेकडील लोकांचे काही गुणः (इथे मी आंध्रप्रदेश, केरळ व तमीळनाडू विचारात घेतले आहेत.)

१. करत असलेल्या कामात झोकून देण्याची वृत्ती.
२. कामामध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता ठेवणे.
३. एकमेकाला मदत करून शिकवणे व शिकणे. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीकडुन कोणताही मुलाहिजा / मानापमान न बाळगता चांगल्या गोष्टी आत्मसात करणे.
४. प्रश्नांची उकल गणीतीदृष्ट्या करणे.
५. घरापासून दूर राहण्याची तयारी ठेवणे व नवीन ठिकाणी लवकरात लवकर समरस होणे.
६. दुसऱ्याची उपयुक्तता पटल्यास त्याला मान देऊन जास्तीत जास्त सहकार्य करणे.

काही अवग़ुणः
१. कमालीचा हेकेखोरपणा
२. केवळ आपल्या भागातील माणसाला जास्त किंमत देणे. इतरांना कमी लेखणे. (काही अपवाद असतील) (आता हे कमी झालेले आहे)
३. स्वतःच्या हुशारीचा गर्वाकडे झुकणारा अभिमान.
४. कमालीची व्यक्तीपूजा.

आपण महारष्ट्रीयन पण हुशार आहोत. आपण पुढारलेले आहोत. सामाजीकस्तरावर आपण इतरांपेक्षा सरस आहोत. आपल्याला नैसर्गीक संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे(खासकरून पश्चिम पट्टा). पण आपली कचखाऊ वृत्ती मारक ठरते. आपले काही अवगुणः (इतरांच्या तुलनेत.)
१. धाडसाचा अभाव.
२. प्रमाणापेक्षा जास्त मानापमान बघणे.
३. चुकीला/नुकसानीला घाबरणे.
४. घरालाच चिकटून राहणे.(प्रमाण जास्त आहे)
५. संधी ओळखण्यात कमी पडणे व मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा न घेणे.
६. आवडते कामः पाय खेचणे व पाटया टाकणे.

हे मला आढळलेले काही गुण / अवगुण आहेत. कमी जास्त असू शकते. चूकीचेही असू शकते. चू. भु. द्या. घ्या.