दक्षिण भारत याचा अर्थ महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेली राज्ये असा असावा.
महाराष्ट्राला लागूनच असलेले कर्नाटक हे राज्य नैसर्गिक साधनसंपत्ती, गुणवत्ता, जमीन, हवामान अशा अनेक गोष्टीत महराष्ट्राइतके, काकणभर सरसच आहे. पण कर्नाटकाची आणि महाराष्ट्राची तुलना केल्यास महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे असे दिसते. रस्ते, वीज - पाणी पुरवठा, लोकांचे जीवनमान, कला.. या सगळ्याच गोष्टी. कर्नाटकातील लोकांचा कर्मठपणा, कर्मकांडे, जुने, प्रसंगी कालबाह्य ते कवटाळून बसण्याची वृत्ती, कुटुंबातले स्त्रीचे नगण्य स्थान... हे सगळे पाहिले की (तुलनेने) महाराष्ट्र बराच बरा असे वाटू लागते. समर्थ राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याने कर्नाटकाच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे. सीमाप्रश्नासारखे निर्णय भिजत पडले आहे. राजकीय नाकर्तेपणामुळे जनताही मुर्दाड झाली आहे. भ्रष्टाचार, सरकारी बाबूगिरी यातही कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढेच आहे. व्यक्तीपूजा आणि विवेकहीनता याची महाराष्ट्रात सहसा न आढळणारी उदाहरणे कर्नाटकात बघायला मिळतात (उदा. डॉ. राजकुमारच्या मृत्यूनंतर झालेली जाळपोळ ). आंध्र प्रदेशातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये बाकी तुलनेने प्रगत आहेत.