मेघदूत/टगोजी,
१. तात्यांनी केलेल्या खुलाशाशी मी सहमत आहे.
२. या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती पुढील लेखांत येणारच आहे, धीर धरावा ही विनंती. अर्थात फाऽऽर हळू चालले आहे असे वाटल्यास तसेही सांगा. मी आपला विषयाचे जास्तीत जास्त पैलू अतिकिचकट न होऊ देता लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मते अजून दोन लेख झाले की अशा गोष्टींची चर्चा करणे सोपे पडेल.
३. कोणत्याही स्वरावरून लगेच दुसरा एखादा स्वर म्हणणे हे काही युक्त्या वापरून साधता येते. उदा. "प्रिये ऽऽ पहा" या गाण्यामुळे सा (प्रि) वरून तडक ध (ये) वर कसे जावे हे कळते. असेच शोधत गेले की इतरही स्वर सापडत जातात.
आम्ही लहान असताना सा वरून लगेच तीव्र म म्हणणे हे एक आव्हान समजले जात असे, पण तेही काही काळाने जमलेच.
४. सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभार.
दिगम्भा