दिवाळीच्या उटण्याचा सुगंध कुवेतला आल्यावर जास्त प्रकर्षाने आठवतो,
त्याचबरोबर शाळेत असताना, ५वीचा वर्ग canteenच्या जवळ असल्याने मंजूचे
बटाटेवडे आणि समोसे तयार होत असताना आलेल्या खमंग वासामुळे मधल्यासूट्टी
आधीच चाळवलेली भूक अजूनही आठवते.
चित्रकलेच्या तासाला चित्रकला कक्षात येणारा तॅलरंग आणि त्याच कक्षाला
लागून असलेल्या प्रयोगशाळेतून येणार रसायनांचा विचित्र पण आवडणारा वास
अजूनही मनात आणि मेंदूत ताजा आहेत.