हिटलरला हिरो ठरवण्यात एक गंभीर धोका आहे. हिरो ठरवले म्हणजे त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ही त्याचे अमानुष वर्तन माफ करण्याच्या आधीची पायरी असू शकते. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडायचा की ह्या नरसंहाराला लोकांचा पाठींबा कसा कायमिळाला? पण आता वाटते की हे तितकेसे अवघड नसावे. त्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेलेले लोक तो म्हणेल ते करयला तयार होते.

एक दुरुस्ती. हिटलरने पोलंड मधेही ज्यूंचा नरसंहार केला होता. पोलंडचा ऑश्विझ येथील कॉन्संट्रेशन कॅम्प कुप्रसिद्ध आहे. दुसरे म्हणजे जर्मनीमधे केवळ सशक्त जर्मन लोकांना(सोनेरी केस, निळे डोळे) आपला वंश वाढवण्याची परवानगी देण्याची योजना चालू होती.  बरेचसे अशक्त, मतिमंद रुग्ण (जे जर्मन होते, ज्यू नव्ह्ते) संशयास्पद रितीने मृत्यु पावले आणि यामागे एस. एस. चा हात होता.

यावर बी.बी‌‌. सी. ने केलेली डॉक्युमेंटरी बघावी.