संजोपजी,
प्रथम मी नोस्टाल्जिया या शब्दाला आक्षेप नोंदवतो.एकीकडे एक मनोगती श्री.मिलिन्द भांडारकर मराठी शब्दभांडार तयार करण्याचा प्रयत्न करत असताना आपण निदान वापरात  असलेला  स्वप्नरंजन हा शब्द तरी वापरूया.
     स्वप्नरंजनात रमणे हा एका विशिष्ट समाजाचा गुणधर्म आहे असे नाही. शेक्सपिअर  म्हटले की कोणत्याही इंग्रजाचा ऊर भरून येतो. सुभाषचंद्र किंवा रवींद्रसंगीत म्हटले की बंगाल्याचा!तसा पु. ल.म्ह्टले की मराठी माणसाचा!
     आता मुद्दा त्यामुळे जुने तेच चांगले आणि नवे ते वाईट असा समज होण्याचा आणि त्यामुळे नव्यावर अन्याय होण्याचा.पण तसे काही होत नसते.माझ्या आईच्या हातची पुरणपोळी म्हणजे काय असे मी म्हटल्यावर बायकोला आपल्यावर अन्याय झाला असे मुळीच वाटत नाही किंवा त्याचा अर्थ तिची पुरणपोळी वाईट असा होत नाही हे तिला माहित आहे.नवे जर चांगले असेल तर त्याचेही कौतुक होत असतेच कुसुमाग्रजांच्या आठवणीत रमणारा मराठी माणूस संदीप खरेचे,बाबूजींच्याइतकेच श्रीधर फडकेचे कौतुक करतच असतो.
      पु. ल.च्या स्मृतिदिनानिमित्त गंहिवरण्यावर आपला आक्षेप तर अगदी बिनबुडाचा आहे.आपल्या पितरांच्या श्राद्धदिनी भक्तिपूर्वक श्रद्धांजली वहाणाऱ्यावर आपण हाच आक्षेप घ्याल का?आपणच तलत, गालिब यावर गहिवरून लेख लिहिले आहेत न?की तो केवळ वरवरचा देखावा होता? वर्तमानात रहाणे याचा आपल्यामते अर्थ भूतकाळ विसरणे असा तर नाही ना?