नोस्टल्जीया या शब्दाला (प्रतिशब्द म्हणून नव्हे) आक्षेप घेऊन कुशाग्र यांनी स्वप्नरंजन या शब्द सुचवला आहे. एकतर हा शब्द फारसा समर्पक नाही. नोस्टाल्जीया मध्ये जी एक उदासवाणी - आता परत या शब्दावर आक्षेप येणार नसेल तर - मेलन्कली - छटा आहे ती स्वप्नरंजनमध्ये नाही. त्या दृष्टीने मी वापरलेली 'रम्य भूतकाळ' हाच शब्द अधिक समर्पक- किमान मला अभिप्रेत असा आहे.
सहमत. 'नोस्टॅलजिया'मध्ये स्वप्नरंजन मुळीच अभिप्रेत नाही. 'रम्य भूतकाळ' अधिक 'गेले ते दिवस' ही भावना, अशी काहीशी अर्थच्छटा अभिप्रेत आहे. (यात मला वाटते मेलंकलीही आले.)
मराठी शब्दांच्या वापराबाबत आग्रही असतानाच तो आग्रह अनाठायी नाही ना याबाबत जागरूक रहाणे गरजेचे आहे. टेबलला मेज,
तसेही मेज हा शब्दसुद्धा मूळचा मराठी नसून पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे, हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. टेबलाला मेज म्हणणे म्हणजे केवळ एका परभाषीय शब्दाऐवजी दुसरा परभाषीय शब्द वापरणे एवढेच व्हावे.
- टग्या.