मग समजा मुसलमान १०० मेले नि हिंदू ९५ मेले तर हिंदू व मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण पहाता हिंदूच जास्त प्रमाणात मेले असे नाही का?
उदाहरणाच्या सोयीसाठी हिंदूंची लोकसंख्या १०००० (दहा हजार) तर मुसलमानांची लोकसंख्या १००० (एक हजार) असे मानू. (हिंदू-मुसलमान लोकसंख्यांच्या गुणोत्तरासाठी १०:१ हे प्रमाण अचूक नसले तरी बऱ्यापैकी प्रातिनिधिक असावे, असे वाटते. परंतु तो मुद्दा नाही.)
समजा १०० मुसलमान मेले, तर १०० / १००० = ०.१ = १०% मुसलमान मेले.
याउलट ९५ हिंदू मेले, तर ९५ / १०००० = ०.००९५ = ०.९५% हिंदू मेले.
तेव्हा हिंदू जास्त प्रमाणात मेले हा आपला दावा गणिती दृष्ट्या चुकीचा आहे.
(खुलासा: यातून हिंदू जिवाची किंमत ही मुसलमान जिवाच्या किमतीपेक्षा दसपट कमी आहे, असा दावा करण्याचा मुळीच हेतू नाही*. हिंदूंचे काय किंवा मुसलमानांचे काय, दोन्ही बळी सारखेच वाईट / दुःखद / निषेधार्ह आहेत. उगाच भलते निष्कर्ष काढू नयेत.)
- टग्या.
*संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) काय वाटेल ते निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येते, याचे हे उत्तम उदाहरण असावे. अर्थात हा निष्कर्ष ग्राह्य धरला, तर मग हिंदू जिवाची किंमत वाढवण्यासाठी एकतर हिंदूंची लोकसंख्या कमी करणे आवश्यक आहे, नाही तर मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे इष्ट आहे, असा (पुन्हा चुकीचा) निष्कर्ष उपप्रमेय म्हणून निघतो. तेव्हा संख्याशास्त्र हा प्रकार एकंदरीत जरा जपूनच वापरावा, हे उत्तम!