एकलव्य,
आपण माझा एक वर्षापूर्वीचा प्रस्ताव उत्खननात पुढे आणल्याबाबत धन्यवाद. यामुळे आपल्या मनोगतीमधले कोण कुठे राहतात हा प्रश्न परत चर्चिला जाईल अशी आशा करतो.
मनोगताचे सभासद किती व त्यांची वैयक्तिक माहिती हे एक सुरक्षित गूढ आहे. त्यात बरेच टोपण नावाने वावरतात त्यामुळे ती मंडळी एकादृष्टीने दिवाभीतच आहेत. त्यामुळे हा कट्टा पुढे सरकणे दुरापास्त झाले आहे. सध्या ५३८० सभासद आहेत. त्यापैकी अमेरिकेत किती ते माहित नाही. हा देश प्रचंड मोठा असल्याने मंडळीपण विखुरलेली आहेत. पण लहान प्रमाणात एकत्र जमणे हे सहज शक्य आहे. अर्थात त्याकरता आपण कोण आणि कुठे राहता या माहितीची देवाणघेवाण आवश्यक आहे. मी परत त्यासाठी काम करण्यास तयार आहे हे सुचवतो.
माझ्या प्रस्तावाला मनकवडा आणि सोनावणे यांचे निरुत्साही (आणि कुत्सित) प्रतिसाद आल्याचे सखेद नमूद करावेसे वाटते.
बघू या मराठी पाउल पुढे पडते का ते ???
सुभाष