पुलंची शैली छान साधली आहे कुमारराव..
हा लेख वाचून १२ जून २००० चा तो दिवस पुन्हा आठवला. सद्गुरुवाचोनी सापडेना सोय ऐकताना फाटकन डोळ्यात पाणी आलं.
पु लं ना आदरांजली म्हणताना आजही गळा दाटून येतो. पुलंनीच एके ठिकाणी असं म्हटलं होतं की "विसावं शतक जेव्हा चाळिशीत शिरलं तेव्हा मी विशीत आलो. आणि या विशीच्या जन्म कुसुमाग्रजांच्या विशाखा नक्षत्रावर झाला...."
मला मात्र असं म्हणायची वेळ आली की मी जेव्हा विशीत शिरले तेव्हा हा आनंदाचा ठेवाच कायमचा हरपला.आणि हा कुयोग कुठल्या कुनक्षत्रावर झाला ते शोधून काढायचं भान राहिलं नाही...

असो...

-अदिती