नेहेरूग्रस्तांकडून हे अपेक्षित नव्हते. आनंद झाला.

नेहरूंनी अनेक चुका केल्या, याबाबत शंका नाही. जसे भाषावार प्रांतरचना, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेणे, चीनविषयक परराष्ट्रीय धोरण (ज्याचे वर्णन नेहरूंनी नंतर स्वत:च ‘हिमालयन ब्लंडर’ म्हणून केले), मह्त्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण. प्रतापगडावर येऊन शिवाजीमहाराजांना ‘लुटारू’ म्हटल्याबद्दल तमाम महाराष्ट्राचा नेहरूंविषयीचा राग आजमितीपर्यंत उतरला नसावा. नेहरूंच्या शीघ्रकोपी आणि आत्मकेंद्री स्वभावाविषयीच्या सुरस आणि चमत्कारिक कथाही बुजुर्गांकडून ऐकलेल्या आहेत. (जसे, मुंबईत भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या [Indian Science Congress] अधिवेशनास प्रमुख अतिथी / उद्घाटक म्हणून नेहरू व्यासपीठावर असता, सभामंडपाच्या कापडाला भोक पडलेले असल्याने उन्हाची तिरीप नेमकी नेहरूंच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे भडकून गैरव्यवस्थापनाबद्दल राग म्हणून दिसलेल्या पहिल्या स्वयंसेवकास बोलावून घेऊन त्याच्या श्रीमुखात भडकावणे. कथा ऐकीव आहे; तपशिलाची चूक असू शकेल, आणि सत्यासत्यताही पडताळून पाहिलेली नाही, तेव्हा विश्वास ठेवणे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावा.) भारतात नेहरूंनी आणलेली समाजवादी अर्थ/राज्यव्यवस्था ही योग्य होती की अयोग्य, याबाबत दुमत असू शकेल, आणि कदाचित तो स्वतंत्र चर्चेचा विषय ठरावा. नेहरूंनी आपल्या हेकेखोरपणामुळे भारतीय सेनेला दुबळे बनवले, असाही एक दावा ऐकण्यात आला आहे.

नेहरू हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते, असा दावा करण्याचा मुळीच उद्देश नाही. अर्थात त्यामुळे हिटलरविषयक प्रस्तुत चर्चेवर काहीही फरक पडू नये.

नेहरूंशी माझी व्यक्तिगत ओळख नव्हती. आणि चाचा नेहरूंनी मला दत्तक घेतले नाही, ही माझी खूप जुनी तक्रार आहे. त्याबद्दल मी त्यांना कदापि क्षमा करू शकणार नाही. माझ्या जन्माच्या सुमारे दोन वर्षे अगोदर त्यांचा मृत्यू झाल्याने यात थोडी अडचण आली, ही त्यांची (लंगडी) सबब मला पटलेली नाही. अर्थात त्यामुळे माझे आयुष्यात काहीही नुकसान झाले नाही, झाले ते बरेच झाले, वगैरे ही सगळी नंतरची सारवासारव झाली. नेहरूचाचांनी मला दगा दिला, हा मूळ मुद्दा राहतोच.

अर्थात परिणामी (नेहरूचाचांच्या) दुर्दैवाने (आणि खरे तर त्यांच्याच चुकीमुळे आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे!) मला ग्रासण्याची फारशी संधी नेहरूचाचांना मिळू शकली नाही, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

(थोडक्यात, I hold no brief for Mr. Nehru. [या वाक्याच्या द्व्यर्थीपणामुळे या वाक्याचे मराठी भाषांतर (विशेषत: शब्दश:) फारच विचित्र होऊ शकते हे लक्षात आल्याने, तो मोह टाळून वाक्य जसेच्या तसे इंग्रजीत मांडले आहे.])

साफ चूक! हे विधान धादांत खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षे आझाद हिंदच्या कुठल्याही वीराची सरकारने यत्किंचितही दखल घेतली नाही, कुणालाही लष्करांत सामावले गेले नाही. त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन १९७२ साली इंदिराजींच्या कारकिर्दीत मिळाले.

माझे प्रस्तुत विधान हे त्रोटक वाचनाच्या व ऐकीव माहितीच्या आधारावर केलेले असल्याने त्यात आपण म्हटल्याप्रमाणे तपशिलाची चूक असणे सहज शक्य आहे. आपले विधान मी अद्याप पडताळून पाहिलेले नाही, परंतु तसे असल्यास I stand corrected.

न्यायालयात बचावाचे म्हणाल तर एक धूर्त राजकारणी म्हणून नेहेरू उभे राहीले खरे पण संपूर्ण लढा दिला तो बॅ. भुलाभाइ देसाईंनी, नेहेरूंनी नाही, सुरुवातीला नेहेरूंनी बचावाचे देखिल राजकारण करून पाहीले पण ते जमले नाही.

शक्य आहे.

अर्थात हे अवांतर आहे, आणि हिटलरविषयीच्या मूळ मुद्द्यावर याने काहीही फरक पडू नये.

- टग्या.