युनिकोड म्हणजे काय ह्याचे उत्तर अतिशय थोडक्यातही देता येईल आणि अतिशय विस्तारानेही देता येईल.
अगदी थोडक्यात सांगायचे तर सर्व देशातल्या संगणक तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन जगातल्या सगळ्या भाषांतल्या सगळ्या अक्षरांसाठी एक एक ठराविक स्थान क्रमाने ठरवलेले आहे. तर कुठल्या स्थानावर कुठले अक्षर ठेवायचे त्याचा संकेत म्हणजे युनिकोड. उदाहरण द्यायचे तर रोमन 'A' हे अक्षर ६५ वे देवनागरी 'स' हे अक्षर २३६० वे ... इत्यादी.
कुतल्याही प्रमाणीकरणाचा होतो तोच फायदा युनिकोडमुळे होतो. जगातल्या एका ठिकाणाहून पाठवलेली मिश्रभाषिक माहिती दुसर्या देशातल्या ठिकाणी पाठवताना, ती खराब किंवा गहाळ होत नाही. वगैरे वगैरे.... केवळ त्या त्या अक्षराच्या स्थानावरून ते कुठल्या लीपीत आहे ते नक्की होते.
अधिक लिहायची इच्छा आहे, वेळ मिळेल त्याप्रमाणे.