भोमेकाकांच्या ई कट्ट्याबद्दलच्या विचाराशी सहमत. हीच कल्पना मी रोहिणीकाकू आणि विनायककाकांना बोलून दाखवली होती. एखाद्या वीकेंडला शनिवार-रविवार मिळून दोन दिवसांचा एक छान कट्टा करता येईल.
भाषकाकांच्या म्हणण्याप्रमाणे ज़वळपासच्या मनोगतींनी प्रत्यक्ष भेटून कट्टा केल्यासही मजा येईल. पण त्यासाठी येथील मंडळी अमेरिकेत कुठे कुठे आहेत, हे कळणे महत्त्वाचे आहे. माझ्या परिचयातील काही मनोगती अमेरिकेत कुठे आहेत, याची माहिती उपलब्ध आहे. तसेच बे एरिया भागातील मनोगतींनी आपापले राहण्याचे ठिकाण, किमान राज्य तरी नमूद करावे, म्हणजे वेळेतील फरक लक्षात घेऊन त्यानुसार निरोपकावर हजेरी लावणे यांसारखे काहीतरी करता येईल.
या ठिकाणी त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून अमेरिकेतील मनोगती आणि राहण्याचे राज्य अशी यादी करतो आहे.
१) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व मनोगतींनी मला व्य नि द्वारे आपले नाव आणि आपण जेथे राहता ते राज्य या गोष्टी कळवाव्यात. मी त्यानुसार या यादीचे आधुनिकीकरण करेन.
२) माझ्या या प्रतिसादास कोणी प्रति-प्रतिसाद देऊ नये, अन्यथा मला यादीचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार नाही.
३) यादीत सध्या उपलब्ध असलेली माहिती ही मनोगतींच्या व्यक्तिरेखांमधील माहिती आणि माझे ज्यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष(निरोपक, व्य नि इ. संपर्कमाध्यमांतून) संवाद झाले आहेत, त्यावरून संकलित करण्यात आली आहे. तसेच या यादीनिर्मितीला इतरही मनोगतींच्या स्नेहसंबंधांतून उपलब्ध असलेल्या संकीर्ण माहितीचा आणि आंतरजालावरील भटकंती आणि माहितीच्या खजिन्याचा हातभार लागला आहे. भाषकाकांनी त्यांच्याकडील यादी मला पाठवल्यास ती या यादीत ज़ोडणे आणि माहिती गोळा करणे सोपे होईल. मनोगतींच्या पूर्वपरवानगीशिवाय अशी यादी प्रसिद्ध करणे नैतिकदृष्ट्या गैर असल्याच्या अपराधी भावनेला तूर्तास बाज़ूला ठेवून या उपक्रमाद्वारे मराठी पाऊल अमेरिकेतही पुढेच पडेल आणि स्थानिक मनोगतींना एकमेकांशी बोलण्याभेटण्याची सुवर्णसंधी मिळेल, या विश्वासाखातर ही यादी येथे प्रसिद्ध करत आहे.
अमेरिकेतील मनोगती आणि ते जेथे वास्तव्यास आहेत ते राज्य ही यादी पुढीलप्रमाणे-
१. चक्रपाणि चिटणीस - नॉर्थ कॅरोलायना
२. श्री विनायक गोरे व सौ. रोहिणी गोरे - नॉर्थ कॅरोलायना
३. कवडी_चुंबक - नॉर्थ कॅरोलायना
४. केदार परांज़पे - नॉर्थ कॅरोलायना
५. सुवर्णमयी - लुइझियाना
६. विश्वमोहिनी - लुइझियाना
७. नंदन होडावडेकर - कॅलिफ़ोर्निया
८. राहुल पेंडसे - कॅलिफ़ोर्निया
९. मैथिली - कॅलिफ़ोर्निया
१०. संवादिनी - कॅलिफ़ोर्निया
११. टग्या - जॉर्जिया
१२. ओंकार कऱ्हाडे - जॉर्जिया
१३. वरुण वैद्य - टेनेसी
१४. परीक्षित - पेनसिल्वेनिया
१५. मुक्तसुनित - वॉशिंग्टन डीसी
१६. श्री. सतीश खेडकर - व्हर्जिनिया
१७. शिरीष इंगवले - ओहायो
१८. रोहित सोमण - नॉर्थ कॅरोलायना
१९. भोमेकाका - सेंट्रल टाइम झोनमधील एक राज्य