ऐश्वर्याचे निळे डोळे... गटात एकतरी नीलाक्षी असणे हा घोटाळा की सरळपणा या नसत्या वादाभोवती व्य नि आणि जाहीर प्रतिसादही घुटमळत आहेत. त्यामुळे निळ्या डोळ्यांच्या गणिताचे जुळे भावंड -- सोपा अवतार -- येथे देत आहे.
-------------------------------------------------------

दावा - जगातील सर्व युवतींचे डोळे एकाच रंगाचे आहेत!

नियम - घोळक्यातील सर्व मुलींचे डोळे एकाच रंगाचे असतील.

पायरी १ः  घोळक्यातील युवतींची संख्या = १; सिद्ध! सोपे आहे नाही!!

पायरी २ः  घोळक्यातील युवतींची संख्या = "य" साठी हे गृहीतक सिद्ध आहे असे मानले. आता त्यावरून समूहसंख्या = "य+१" साठी प्रयत्न!
सोपे जाण्यासाठी निता, कुळा, विता, डायना, रावती, आणि फातिमा या ६ जणींच्या गटासाठी हा नियम सिद्ध करू या. अर्थात ५ जणींसाठी हा नियम सिद्ध झालेला आहे असे मानले आहेच.

झाले तर मग!!

म्हणजे induction principle नुसार जगातील सर्वच युवतींचे डोळे एकाच रंगाचे आहेत हा आपला दावा सिद्ध झाला म्हणायचे तर मग!
घोटाळा आहे हे मान्य... शोधून काढण्यासाठी आणखी दोन दिवस आहेत!!
---------------------------------------

अधिक माहिती येथे पहा... उदाहरण - २.३.१० दिसेलच!!