या उपक्रमाला बालीशपणा समजणारे  मनकवडा आनि सोनावणे हे एकटेच नाहीत. संकेतस्थळावर वावरणाऱ्यांची अनामिक रहाण्याची इच्छा लक्षात घेतली तर संकेतस्थळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्यांचे असे ध्रुवीकरण अनावश्यक आहे हेही ध्यानात येईल.माहितीजालाच्या माध्यमातून एकत्र आलेल्यांनी प्रत्यक्ष एकत्र येऊन 'आपण नेटवर एकमेकांना चांगले म्हणतोच की, मग प्रत्यक्ष भेटून एकमेकांना अधिक चांगले का म्हणू नये?' असा प्लास्टीकपणा करण्याची गरज असेलच तर मी तुम्हाला नवज्योतसिंग सिद्धूप्रमाणे 'यू कॅनॉट मर्डर अ मॅन हू हॅज डिसायडेड टु कमिट सुइसाइड' असे म्हणून शुभेच्छा देतो.