ता.क. मलीन गोष्टींना आपण मळकट म्हणतो, तद्वत हलकेच घेणाऱ्यास हलकट म्हणावे की काय?

-- हे वाचून, (पुन्हा) पु. लं. चीच एक कोटी आठवली. विमानात खाण्यापिण्याची सरबराई करणाऱ्यांना जर आपण 'हवाई सुंदरी' म्हणतो, तर मग औषधपाण्याची व्यवस्था करणाऱ्या नर्सला 'दवाई सुंदरी' का म्हणू नये?