तात्या, अशा प्रसंगांच्या ( न विसरता भारतात पाठवण्यासाठी काढलेल्या ) तबकड्या तुम्ही पाहिल्या असतील. एकजात कुंकुमतिलकासकट झब्बा पायजमा घातलेले भावविभोर इन्डो अमेरिकन्स. 'सासुबाईंनी दिली होती..'असे म्हणत अवजड पैठणी सांभाळणाऱ्या ( आणि आता त्या सासुबाईंना पंधरा दिवसातून एकदा फोनचा रतिब टाकला की झाले....) इन्डो अमेरिकन्या, आणि हे सगळे काय चालले आहे अशा गोंधळात पडलेले ( हे कसले कल्चरल फ्यूजन.... हे तर कल्चरल कन्फ्यूजन असले भाव चेहऱ्यावर असलेले) निओ अमेरिकन्स...
अशा लुटुपुटुच्या पोषाखी समारंभासाठीचा (मी वापरतो तो ) शब्द - झब्बट.