एकजात कुंकुमतिलकासकट झब्बा पायजमा घातलेले भावविभोर इन्डो अमेरिकन्स. 'सासुबाईंनी दिली होती..'असे म्हणत अवजड पैठणी सांभाळणाऱ्या ( आणि आता त्या सासुबाईंना पंधरा दिवसातून एकदा फोनचा रतिब टाकला की झाले....) इन्डो अमेरिकन्या, आणि हे सगळे काय चालले आहे अशा गोंधळात पडलेले ( हे कसले कल्चरल फ्यूजन.... हे तर कल्चरल कन्फ्यूजन असले भाव चेहऱ्यावर असलेले) निओ अमेरिकन्स...

सन्जोप, आधी चर्चेला उत्तेजन देऊन आता मात्र तुम्ही स्वतःच न्यायनिवाडा करायचा निर्णय घेतलाय असं वाटतंय.

तुम्ही म्हणता ते प्रकार अमेरिकेतच काय, बंगाल, मिझोराम, अंदमान, अथवा दुबईच्या मराठी कार्यक्रमांतूनही दिसतील. किंवा मुंबई-पुण्यातल्या तामिळ/बंगाली कार्यक्रमांतही दिसतील. त्या सर्व ओकाऱ्याच म्हणायच्या का? कोणीही कसं पटकन अमेरिकेवर घसरतं ते पाहून खरंच गम्मत वाटते.

आणि कल्चरल कन्फ्यूजन "आपल्याकडे" काही कमी आहे का? पुण्या मुंबईच्या मराठमोळ्या लग्नसमारंभात, शालू नेसलेल्या वधूच्या मागोमाग, जांघा दाखवणाऱ्या तुमानी घातलेल्या करवल्या दिसतातच की! ते फार "सुसंगत" दिसतं की काय?

- (अर्थातच अमेरिकास्थित) कोंबडी