मी सुद्धा एक मराठीच आहे आणि मला त्याचा पूर्णं अभिमान आहे. कधीकधी गडबडीत टंकलेखन करताना शब्द चुकू शकतात आणि ते लक्षात येत नाहीत. ह्यामध्ये स्वतःची ओळख विसरण्यासारखे काही असावे असे वाटत नाही. आणि जर असा विचार केला तर केवळ उल्लेख (किंवा शब्द) बरोबर असल्याने ओळख निर्माण होत असेल तर मुंबईमध्ये (आणि हळूहळू उर्वरित महाराष्ट्रात) 'मी मराठी' चा केवळ जयघोष केल्यास मराठी माणसाची ओळख निर्माण होईल असे वाटते. वेगळे काही प्रयत्न करावे लागतील असे नाही.

मी माझ्या प्रतिक्रियेत शेवटचा मुद्दा मांडला आहेः
एकमेकाचे पाय खेचणे.

इथे चर्चा मराठी आणि दक्षिण भारतीय लोकांच्या गुणांची / अवगुणांची आहे. अशा छोट्याछोट्या गोष्टींवर वाद घातल्याने मूळ मुद्दा बाजूला पडतो. हेच मराठी लोकांचे इतर बाबतीत होते.  काळाची गरज ओळखून थोडेफार बदल स्वीकारले (हे भाषेच्या बाबतीत पण लागू आहे) तरच प्रगती होते. आज सगळीकडे इंग्रजीचा वापर असल्याने (कारण १०० ठिकाणाची माणसे एकत्र येतात) थोडाफार इंग्रजीचा गंध येणे साहजिकच आहे.