' माझा भारत..माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
हे वाक्य काहींना झोंबलेले दिसते!
एकतर हे विधान सरसकट नाही. सर्वच परदेशस्थ असे आहेत असा यातून ज्यांनी अर्थ काढला आहे अशांनी आपले व्याकरणाचे ज्ञान तपासून पहावे.
दुसरे, ज्यांना हे वाक्य आवडले नाही, त्यांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. आपण असे आहोत का? असाल तर हे खरे आहे, त्यामुळे राग येण्याचे कारण नाही. नसाल तर हे वाक्य तुम्हाला लागूच नाही, तेंव्हा परत राग येण्याचे कारण नाही.
पण अशा निमित्ताने समाजातला दांभिकपणा कसा चव्हाट्यावर येतो ते पहा. सत्य हे बऱ्याच वेळा आपल्याला गैरसोयीचे असते, तेंव्हा ते आपण सोयीस्कररीत्या डोळ्याआड करतो आणि जे आपल्याला सोयीस्कर आहे, त्यालाच सत्य मानू लागतो. अशा वेळी सत्याच्या जवळपास जाणारे काहीही आपल्याला गैरसोयीचे असल्याने खुपू लागते.
आणि प्रश्न अमेरिकेवर घसरण्याचा नाहीच आहे. पुण्या-मुंबईत किंवा भारतात कुठेही चाललेली सांसकृतिक भेसळ हाही या चर्चेचा विषय नाही. प्रश्न आहे तो भारताबाहेर राहून भारतियत्वाचे उसने उसासे काढ्णाऱ्यांचा. आणि तसे नसतेच ही बाकी स्वतःची फसवणूक आहे. आपण तसे आहोत का हा ज्याचा त्याचा प्रश्न. यात कुठेही न्यायाधिशी भूमिका मी घेतली आहे असे मला वाटत नाही. किंबहुना मूळ चर्चाही या दिशेने चाललेली नव्हती. मिलिंदरावांनी उपस्थित केलेला मुद्दा मला महत्वाचा वाटला म्हणून त्यावर मी माझे मत दिले इतकेच.