सुरेख रचना. यथातथ्य अभिव्यक्ती.
मात्र, ही कविता आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 'व्रात्यस्तोम' पद्धतीची, म्हणजे व्रात्य व्यक्तीचे अतिरिक्त स्तोम माजविणारी असल्याने, केवळ लोकानुनयी स्वरूपात मोडते. लोकजागृतीच्या सदरात मोडेल अशा निखळ विडम्बनात्मक अभिव्यक्तीची अपेक्षा तुमच्याकडून निसर्गतःच निर्माण झालेली आहे.
ज्यांची गाऱ्हाणी जनतेपर्यंत पोहोचत नाहीत त्यांच्या दुःखाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी ह्या सर्जनशील प्रतिभेचा वापर करावा. तसे झाले तर सोनिया सुगंधू येईल!