सातीताई, कविता सुंदर आहे. विनोदी कविता रचण्याची तुमची हातोटी खरोखरीच कौतुकास्पद आहे.

क्षुद्र विषयावरील उत्तम विडंबन!

जयन्ता यांनी याला विडंबन का म्हणावे ते कळले नाही. मला वाटते ही एक स्वतंत्र रचना आहे.(अर्थात एका लोकप्रिय गाण्याला समोर ठेवून लिहिली आहे म्हणा.)

राखी सांभाळ मिकी हा आला....

हाहाहा. हेही छान.

मात्र, ही कविता आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 'व्रात्यस्तोम' पद्धतीची, म्हणजे व्रात्य व्यक्तीचे अतिरिक्त स्तोम माजविणारी असल्याने, केवळ लोकानुनयी स्वरूपात मोडते. लोकजागृतीच्या सदरात मोडेल अशा निखळ विडम्बनात्मक अभिव्यक्तीची अपेक्षा तुमच्याकडून निसर्गतःच निर्माण झालेली आहे. ज्यांची गाऱ्हाणी जनतेपर्यंत पोहोचत नाहीत त्यांच्या दुःखाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी ह्या सर्जनशील प्रतिभेचा वापर करावा.

नरेंद्रराव यांच्याशी असहमत. त्यांनी असे का म्हणावे ते कळले नाही. प्रत्येक काव्यात (किंवा साहित्यात म्हणूया) मनोरंजन करणारा नि काही सांगणारा(काही बोध देणारा) असे दोन भाग अंतर्भूत असतात. (भाग - प्रकार नव्हेत.) म्हणजे प्रत्येक साहित्यकृतीत हे दोन्ही घटक असणारच. जसे की एखाद्या रहस्यकादंबरीत मनोरंजन हा महत्वाचा भाग असतो, पण 'पापाचे फळ मिळतेच' हा बोध आहेच.  मला वाटते की ही कविताही अशीच आहे. यात मनोरंजन आहे, पण राखी सावंतला हास्यास्पद ठरवणे नि तिच्या वर्तणुकीतला विरोधाभास दाखवून तिची टर उडविणे - पर्यायाने 'असा विरोधाभास आपल्या जीवनात असल्यास तुम्हीही हसण्याचे कारण बनाल' हा संदेश देणे ही 'समाजोपयोगी' कामेही ही कविता करतेच की ! काय?

एक वात्रट

अवांतर - 'समाजोपयोगी' हा शब्द बरोबर आहे ना? की तो 'समाजपयोगी' हवा?