प्रिय भारतीय-म्हणूनच-हिंदू-बाळू,
तुमचे संपूर्ण नाव कळाले. आवडले. विशेषत: 'म्हणूनच'.
प्रशासक हे त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत व त्यात ढवळाढवळ करण्याची मला तसेच "तुम्हाला सुद्धा" काहीच गरज नाही.
हो का? कळले हो. पण प्रशासकांचा परवलीचा शब्द मला माहीत नाही. त्यामुळे ढवळाढवळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
वरील चर्चेची मी वायफळ, फालतू, वांझोटी अशी केवळ संभावना केली आहे. पण चर्चा काढून टाकण्याचा अधिकार सध्यातरी प्रशासकांनी स्वतःकडेच ठेवला आहे. त्यामुळचे इथे रडण्याऐवजी प्रशासकांकडे तक्रार करा.
तुम्ही गळचेपीचे धोरण घेत या चर्चा "वायफळ" आहेत असे हिटलरी आक्षेप नोंदवता. तुमच्या या धोरणाविरुद्ध मी माझा आक्षेप नोंदवला आहे.तुमच्या या धोरणाविरुद्ध मी माझा आक्षेप नोंदवला आहे.
भारतीय-म्हणूनच-हिंदू-बाळू, वरील विधाने अत्यंत हास्योत्पादक आहेत. विशेषतः गळचेपीचे धोरण आणि हिटलरी आक्षेप. त्यामुळेच वाचून आनंद झाला. मौक्तिके आहेत मौक्तिके.
मला प्रशासक समजून तुम्ही वरील वाक्ये खरडलेली दिसतात. तुमचा गैरसमज झाला आहे. तशीही तुम्हाला चुकीच्या जागी चुकीचे प्रतिसाद, निरोप पाठवायची सवय दिसते.
चित्तरंजन भट
अवांतर:
हिटलरी आक्षेप हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. हिटलरची अवमानना करणारा आहे. हिटलरशाहीत आक्षेपबिक्षेप
नोंदवायचे नसतात. विरोधकांना गॅस चेंबरात ढकलायचे असते. आता त्याने तुमचे काय करावे?