वृत्तांत आवडला. मनापासून लिहिला आहे.
कोकदेखील ढोसतात हे माहीत नव्हते. अर्थात भेसळ केल्यास ढोसता येईल.
विनायकरावांच्या व्यासंगाबद्दल प्रश्नच नाही आणि सौ. रोहिणीताई सुगरण आहेत ह्याबद्दलही वाद नाही. म्हणजे सौ. रोहिणीताईंचा स्वयंपाक वाचताना तर चांगला लागतो. आता जेवूनही बघावे लागेल. अडेरबिडेर.
कोबीची डाळ घालून भाजी, कुर्मा, आमटीभात, खीर आणि मुख्य म्हणजे पोळ्या. अहाहा!
अहाहा! कोशिंबिरी-चटण्या नव्हत्या काय? त्यांचाही उल्लेख हवा होता. त्यांच्यावर का बरे अन्याय!
ते जेवण जेवल्यावर मला, कोणत्या अधिकारलेखणीने काकू मनोगतावर चमचमीत पाककृती देत असतील, याची चांगलीच प्रचिती आली.
वाव्वा! अधिकारलेखणी. पण अधिकारबोटांनी हवे होते असे वाटते. तसेच 'अहाहा!' आधीच म्हटलेस हे चांगले केले. अन्यथा लोकांनी (मी नाही बरे) 'चांगलीच प्रचिती' चा वेगळा अर्थ काढला असता.
चित्तरंजन
अवांतर:
वाटेत टॉपसेल बेटावरील समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असे ठरले (बहुतेक
माझ्या एका मित्राने टॉप'सेल' बीच ऐवजी टॉप'लेस' बीच असे वाचले असावे ;))
माझ्यामते शंकेला स्थान नाही इथे. असावे अनावश्यक आहे. ;)) राहू द्या.