मतदानाला अर्थ येईल जर का मतदान करणारे संगीतातले जाणकार असतील तर; अन्यथा तो आणखी एक आकड्यांचा खेळ ठरावा असे वाटते.

केवळ कानाला चांगले वाटते म्हणून एखाद्या गायकाला मत देणे वेगळे आणि उत्तम गायकीसाठी एखाद्या गायकाला मत देणे वेगळे असे वाटते. हा फरक त्या क्षेत्रातले जाणकार आणि/अथवा तज्ज्ञच जाणू शकतात असे वाटते.

समजा पुलांची चित्रे पाहून एखाद्या स्थापत्य अभियंत्यासाठी लोकांकडे कौल मागितला असता सामान्य माणसे ज्याचे पूल सुंदर दिसतात त्याला मत देण्याची शक्यता अधिक आहे. पण त्या क्षेत्रातल्या जाणकारांसाठी सुंदरता हा अनेक निकषांपैकी एक निकष असेल आणि तो सुद्धा पहिल्या क्रमांकाचा निकष नसेल असे वाटते.

मतदात्यांची त्या क्षेत्रातली जाण किती हे महत्त्वाचे आहे असे वाटते.