लोकजागृतीच्या सदरात मोडेल अशा निखळ विडम्बनात्मक अभिव्यक्तीची अपेक्षा तुमच्याकडून निसर्गतःच निर्माण झालेली आहे.

सातीताईंच्या वतीने बोलू इच्छीत नाही, पण सातीताईंनी लोकजागृतीचा ठेका घेतला आहे असे मला वाटत नाही. (त्यांनी तसे म्हटल्याचे किंवा तसा आव आणल्याचेही स्मरणात नाही.)

एक निखळ विनोद म्हणून, कवयित्रीकडून कोणतीही (चॅरिटेबल? फिलँथ्रॉपिक? नेमका शब्द? मराठी प्रतिशब्द?) अपेक्षा न ठेवता या (किंवा अशा कोणत्याही) रचनेचा आस्वाद का घेता येऊ नये हे कळले नाही. एक 'सोशल कॉमेंट' म्हणून रचना उत्कृष्ट आहे, असे मला तरी वाटले. ती तशीच का राहू नये, तिच्यावर 'सामाजिक उत्तरदायित्व' वगैरे का लादले(च) पाहिजे, या गोष्टी निदान माझ्या तरी पलीकडच्या आहेत.

ज्यांना गाऱ्हाणी वगैरे आहेत, त्यांनी ती ('उद्धरेत् आत्मनात्मानं' तत्त्वाप्रमाणे) आपली आपण मांडावीत, ते काम तिसऱ्याच्या खांद्यांवर ढकलू नये. दुसऱ्यांच्या गाऱ्हाण्यांना अभिव्यक्ती, लोकजागृती, समाजोद्धार वगैरे उदात्त कार्यांत ज्यांना रस आहे, त्यांनी  ती (यथाशक्ती) स्वतः करावीत, (परस्पर) इतरांकडून करवून घेण्याची अपेक्षा करू नये.

- टग्या.