सा ची कंपनसंख्या २५६ व र्सा ची ५१२ हा मूळ निकष. तसेच सां ची कपनसंख्या १२८ व सा ची १०२४ हे ही मग आपोआप ठरते. आता यात बारा स्वर बसवायचे म्हणजे ५१२/२५६ = २ याचे बारावे मूळ (१.०५९४६३) घ्यावे लागते (१.०५९४६३ गुणिले १.०५९४६३ गुणिले १.०५९४६३ असे बारावेळा = २). या युक्तीमुळे प्रत्येक दोन जवळच्या स्वरांतील अंतर एकच राहते. सा पासून रेरे पासून रे हे सारख्याच अंतरावर पडतात. ही आपली नेहमीची अंकगणिती श्रेणी नसून घातांक-प्रमाणातली (लॉग-स्केल) आहे याची नोंद घ्यावी.

संगीतातले स्वर आणि पदार्थविज्ञान यांचा असा सबंध मातृभाषेतून प्रथमच वाचत आहे. धन्यवाद.