ई-कट्ट्याला कोण कोण तयार आहे? तसेच ई-कट्टा भारत, अमेरीका, इंग्लंड या सर्व देशातील मनोगतींना एकत्रित करता येईल असे वाटते. त्याकरता एक वेळ ठरवावी लागेल. त्याकरता अमेरीकन वेळेनुसार शनिवार दुपार , इंग्लंड वेळेनुसार शनिवार संध्याकाळ,  व भारतीय वेळेनुसार शनिवार रात्र असे करता येईल का? या तिनही देशांकरता शनिवार योग्य ठरेल असे वाटते. याचे आयोजक कोण? भारतातील कोणी अनुभवी मनोगती होऊ शकेल. शिवाय हा कट्टा मनोगतवरच करता येईल का? अजून कोणाला या ई-कट्ट्याच्या कल्पना सूचत असतील त्यांनी त्या सांगाव्यात.