सहमत.

पूर्वीच्या काळातल्या कथालेखकांना/चित्रपटकथालेखकांना 'आई मरणे' या संकल्पनेचे एवढे 'फेटिश' का असे, कळत नाही. नेमकी उदाहरणे आठवत नाहीत, पण अनेक मराठी चित्रपट या संकल्पनेवर तगले असावेत, असे वाटते.

लहानपणी सानेगुरुजींची एक काहीशी अशाच स्वरूपाची पण (विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू सानेगुरुजी) थोडीशी 'प्रेयसी/बायको-वाईट-आई-चांगली' किंवा 'प्रेयसी/बायको-मुलाचे-मन-आईविरुद्ध-वळवते-आणि-वेळप्रसंगी-स्वतःच्या-स्वार्थासाठी-आईचा-खूनही-करायला-मुलाला-भाग-पाडते' छापाची ('छाप' हा शब्द 'स्टीरिओटाईप' अशा अर्थाने) कथा वाचल्याचे आठवते. ('[तरीही-]आईचे-काळीज-मुलासाठी-द्रवते' असे काहीसे [प्रस्तुत कथेसारखेच] तात्पर्य होते.)

'आईचे काळीज मुलासाठी द्रवते'ला आक्षेप नाही, पण त्यासाठी आईला मारलेच पाहिजे का? अहिंसक मार्गाने हे विधान नाही का करता येणार? पु.लं.च्या 'रावसाहेबां'च्या शब्दांत थोडा फेरफार करून "आई मारून लोक रडवून कहाणी खपवणे म्हणजे पाप हो!" असे म्हणावेसे वाटते.

(वैधानिक इशारा: 'कहाणी खपवण्या'चा आरोप सानेगुरुजींना उद्देशून नाही, केवळ या संकल्पनेचा कंटाळा येईपर्यंत पुनर्वापर करू पाहणाऱ्या wannabes [मराठी प्रतिशब्द?]ना आहे. उगाच मारामाऱ्या नकोत! [तसेही सानेगुरुजींना आपल्या कहाण्या/पुस्तके 'खपवण्याची' आवश्यकता (किंवा इच्छाही) नसावी, असे वाटते.])

(अवांतर: तसे पाहिले तर 'आई चांगली' किंवा 'आईचे काळीज मुलासाठी द्रवते'साठी 'बायको/प्रेयसी वाईट'च कशासाठी असायला हवी, हेही कळत नाही. कदाचित आईवडिलांनी शोधून आणलेल्या सदैव मान खाली घालून असणाऱ्या मुलीशी निमूटपणे लग्न करणे म्हणजेच चांगले आणि प्रेम करणे म्हणजे 'बाईमागे लागणे' किंवा 'बाईलबुद्धेपणा' असे मानणाऱ्या जमान्याचा प्रभाव असावा.)

- टग्या.