पीडीएफ धारिण्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी जालावर साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी निःशुल्क किंवा सशुल्क सेवा वापरता येतील. साठवण्याच्या क्षमतेवर (available storage space) आणि देवाणघेवाणीच्या दरावर (bandwidth) बंधने असतात. निःशुल्क सेवांमध्ये जागा आणि देवाणघेवाण दर कमी असतो.

याहू जिओसिटीज़ हे निःशुल्क सेवेचे एक उदाहरण आहे. याहू आयडी असल्यास ही सेवा वापरता येते. तिथे आपल्याकडील धारिण्या, चित्रे आणि इतर प्रकारचे साहित्य चढवता येते. त्यानंतर हे सर्व साहित्य जालावर उपलब्ध होते. उदा. शून्य ही पीडीएफ फाईल मी जिओसिटी वर ठेवलेली आहे.

सशुल्क सेवा गुगलून काढता येईल.

पीडीएफ तयार करायची असल्यास ओपनऑफिस.ऑर्ग ही मुक्तस्रोत प्रणाली उतरवून घ्या आणि इंस्टॉल करा. (ओपनऑफिस ही मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखी संपूर्ण कार्यालयीन प्रणाली (वर्डप्रोसेसर, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन इ.) आहे. इंस्टॉल करण्याआधी संगणकावर पुरेशी जागा आहे याची खात्री करा. जालाची जोडणी वेगवान असल्यास चांगली) त्यानंतर जे लिखाण पीडीएफ मध्ये रुपांतरित करायचे आहे ते लिहा किंवा चिकटवा. त्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पर्याय निवडा,




"पीडीएफ ऑप्शन्स" खिडकीत आवश्यक तसे बदल करा




मजा करा! (enjoy ;)

आपला,
(माहितीदाता) शशांक