याआधीच्या माझ्या प्रतिसादात सानेगुरुजींच्या याच गोष्टीचा उल्लेख होता. तपशील आठवत नव्हते. कथेबद्दल आभारी आहे. (कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळताजुळता नसला तरी.)

तशी 'बायको कोणाचेतरी काळीज मागते' ही संकल्पनासुद्धा थोडी जुनीच. पंचतंत्रात सुसरीण आपल्या नवऱ्याला (त्याचा मित्र असलेल्या) माकडाचे काळीज मागते (पुन्हा बायको वाईट / is the root cause of all evil!) अशी एक कथा वाचल्याचे स्मरते. अर्थात त्या गोष्टीत माकड हुशार असल्याने सुखांतिका होते, हा भाग वेगळा!

- टग्या.