कोणीही कसं पटकन अमेरिकेवर घसरतं ते पाहून खरंच गम्मत वाटते.

बहुसंख्य परदेशस्थ भारतीय अमेरिकेत असल्याने, अमेरिकेवर* घसरणे अगदी तर्कसंगत आहे असे वाटते. आजच्या काळात अमेरिकेत जाण्यासाठी वडिलांकडे पुरेसा पैसा असणे किंवा अमेरिकेत राहणारा नवरा मिळणे अशी कारणे पुरेशी आहेत**. त्यामुळे अमेरिकेत जाणे/राहणे ह्याचे पूर्वी इतके अप्रूप राहिले नाही. तुमच्याच शब्दात (की कुकुऽचकूटात?) सांगायचे तर "कोणीही कसं पटकन अमेरिकेला जातं?" अशी परिस्थिती आहे. असो.

संजोप रावांनी व्यक्त केलेली मते (दुर्दैवाने) पटण्यासारखी आहेत. अर्थात सर्व परदेशस्थ असे असतात असे नाही (त्यांनी सरसकट सर्व परदेशस्थांवर टिप्पणी केली आहे असे वाटत नाही.) त्यामुळे कुणी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.

* "अमेरिकेवर घसरणे" मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर घसरणे अपेक्षित असावे. अमेरिकेवर घसरायचेच असेल तर त्यांची परराष्ट्रनीती, इराक, गॉन्टॅनो बे इ. इ. बरीच कारणे आहेत.

** इथे त्यांना नावे ठेवण्याचा किंवा कमी लेखण्याचा उद्देश नाही. केवळ ही प्रक्रिया सहजसाध्य झाली आहे इतकेच म्हणायचे आहे.