शशांक - कष्टपूर्वक हे सारे तपशील पुरविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
विशेषतः पी डी एफ् तयार करण्याची माहिती तर खूपच उपयोगाची आहे. ह्या वजनाला हलक्या आणि नेहमीच प्रमाणबद्ध राहणाऱ्या प्रकारात लिखाण करायचे तर अडोबीकडून विकतच घ्यायला पाहिजे असे मत होते.
जीओसिटीज ज्यातऱ्हेने संकेतस्थळ बांधायला मदत करते, त्यामार्गाने जाऊन मला चित्रे चढविणे, दुवे पुरविणे, मजकूर लिहिणे हे जमले आहे. पण पी डी एफ् चा मार्ग दिसलेला नाही... त्यामुळेच खरे तर हा चर्चाप्रपंच! पण तेथे हे जमेल असे खात्रीपूर्वक समजल्यामुळे पुन्हा प्रयत्न करतो.
शशांक - आपल्याला वेळोवेळी त्रास देत राहीन... कृपया सहकार्य असावे.