अमेरिकेत जाणे/राहणे ह्याचे पूर्वी इतके अप्रूप राहिले नाही.

खरयं आजकाल कोणीहि अमेरिकेला जात, यासाठी श्रीमंत बाप किंवा अमेरिकेत रहाणारा नवरा असण्याची गरज नाही. पण अनेक प्रतिसादांतून "उगीचच" अमेरिका द्वेष दिसतो.

सरळ सरळ अमेरिकेवर घसरायचे प्रयत्नही मनोगतावर झालेले दिसतात. तुम्ही म्हणता तसे त्यात अमेरिकेवर कमी पण आडून पाडून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर घसरणे अपेक्षित असावे. अमेरिकेच्या "नरसंहारा" विषयी एक चर्चा हल्लीच वाचली होती. तेव्हा येथे अमेरिकाच का येते? नायजेरिया नाहीतर  सुदान सारखे देश का येत नाहीत? संजोप रावांनी सरसकट सर्व परदेशस्थांवर टिप्पणी केली आहे कि नाही हे त्यांच्या प्रतिसादावरुन सांगता येत नाही.

"मॅकडोनाल्डी" भारतीय मुलं हा प्रकार अमेरिकेत आहे त्या पेक्षा कित्येक जास्त पटीने मुंबईत मी अनुभवला. कपड्यांच म्हणाल तर मी कॉलेजला असताना पंजाबी ड्रेस अधिक वापरायचे. मुंबईत आज तो तरुण मुलींच्या अंगावर औषधाला दिसतो. तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या "ट्रॅडिशनल डे"ला त्या अशाच नऊवारी नेसत असाव्यात.

शेवटी आपल्याकडे जे नसत त्यालाच माणूस miss करतो किंवा जे निसटून जातय ते सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो... त्यात काही वावगं आहे का? मनुष्य प्रवृत्ती आहे..त्यात अमेरिकास्थित मराठी, बंगलोर स्थित मराठी असे प्रकार असावेत असे वाटत नाही.

परदेशात जिथे असू तेथे कितीही विसंगत दिसत असले .....

का बर विसंगत दिसत असाव? इथे ज्यू लोक डोक्यावर टोप्या घालून सर्रास फिरतात. अमिश लोक त्यांचे कपडे वापरतात. चीनी जपानी लोक त्यांचे कपडे, संस्कृती जपतात. अरबी बायका हिजाब वापरतात. स्वतः अमेरिकन लोक दुसऱ्यांच्या कपड्यांवर, रहाणीवर कधीही टिका करत नाहीत. तेव्हा आमच्या पोरांनी "सांस्कृतिक" कार्यक्रमात नऊवारी नेसली तर विसंगत का दिसाव? आणि  महाराष्ट्रातील पोरांनी वापरल तर वावगं दिसू नये अस काही आहे का?

आणि चर्चा जर परदेशस्थांविषयी चालली होती तर मग कधीही हटकून (यात फक्त संजोप राव मोडत नाहीत तर इतरत्रही) डॉलरध्येय, मॅकडोनाल्डी हेच शब्द कसे दिसून येतात. दिनार, रियाल, पौंड, दिरहॅम इ. का नाही?

रावांचा चर्चेच्या सुरुवातीचा "सूर" वेगळ असल्याचे दिसते. त्याला "नरेंद्र गोळ्यांचे" उत्तर समर्पक आहे.