अमेरिकेत सहसा ३ गॅ. चा दुधाचा कॅन मिळतो
१ गॅलन = ३.७८५४१२ लीटर
एककांमध्ये गोंधळ झाला आहे असे वाटते. प्रियालीताईंना ३ लीटर म्हणायचे असावे असे वाटते.
आम्ही मात्र यापुढे या देवळात जाऊन देवाच्या नावे देणगी, दान करायचे नाही असे ठरवले. त्यापेक्षा आम्ही काही आदीवासी मुलांच्या शिक्षणाचा खर्च देतो तो यावर्षी पासून दुप्पट करण्याचे ठरवून आलो.
असेच काहीसे!
(अवांतर-
या आणि अश्या उपक्रमांबद्दल वाटाः खारीचा किंवा सिंहाचा या चर्चेत सांगता येईल. अर्थात काही लोकांना "दान हे गुप्त असावे" अश्या बुरख्याखाली झाकली मूठ सव्वालाखाची ठेवायची असते. पण इतरांना त्यातून कल्पना/प्रेरणा मिळू शकते याची कल्पना नसते असे वाटते.)