काका,

१ गॅलन = ३.७८५४१२ लीटर

चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. एककात चूक झाली... अजून जुनी सवय गेली नाही...

अवांतरः

"दान हे गुप्त असावे" अश्या बुरख्याखाली झाकली मूठ सव्वालाखाची ठेवायची असते.

हे लक्षात आलं होत पण तरीही येथे लिहिल कारण खऱ्या अर्थाने तिथे ते मला बढाई मारण्या सारख वाटल होत आणि इथे पर्याय म्हणून लिहिल. हे माझ व्यक्तिगत मत झालं इतरांवर टिका मुळीच नाही आणि इथेही काहीतरी फार मोठ केल्यासारखा देखावा करण्याचा हेतू नाही.

काही वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबीयांपैकी एकांनी कुपोषित झालेली लहान मुलगी दत्तक घेतली होती. तिची स्थिती अशी की तिला चांगले अन्न पचायचे नाही. दगडाच्या मूर्तीवर मधा दुधाचा अभिषेक करण्या पेक्षा या लोकांना ते दूध लहान मुलांच्या तोंडि जावे अशी अंतःप्रेरणा न होणे हे मला अतिशय आश्चर्याचे वाटते.