प्रियालीताई,
आपण उधृत केलेले पहिले वाक्य माझ्या प्रतिसादातील आहे पण दुसरे नाही. त्यामुळे या प्रतिसादाची जागा जऽराशी चुकल्यासारखी वाटते. असो.
अमेरिकेच्या "नरसंहारा" विषयी एक चर्चा हल्लीच वाचली होती. तेव्हा येथे अमेरिकाच का येते?
नरसंहाराच्या चर्चेतून अमेरिकेला वगळणे केवळ अशक्य आहे असे वाटते पण हा वेगळ्याच चर्चेचा विषय आहे आणि जगभरात निरनिराळ्या माध्यमातून या विषयावर चर्चा सुरू असते. पण ह्याला अमेरिकेचे राज्यकर्ते, परराष्ट्र धोरण आणि मिलिटरी-इंडस्ट्रिअल-कॉम्प्लेक्स जबाबदार आहे, सामान्य अमेरिकन जनतेवर या चुकांचे खापर फोडता येणार नाही. असो.
"मॅकडोनाल्डी" भारतीय मुलं हा प्रकार अमेरिकेत आहे त्या पेक्षा कित्येक जास्त पटीने मुंबईत मी अनुभवला......
संजोपरावांनी सांगितलेली प्रवृत्ती भारतातही आहेच. पण "भारतातील काही लोकही असे करतात म्हणून..." असे समर्थन देण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जर पटत असेल की आपण जे काही करतो आहोत ते केवळ दिखावा नसून मनापासूनचे आहे तर वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.
शेवटी आपल्याकडे जे नसत त्यालाच माणूस miss करतो किंवा जे निसटून जातय ते सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो... त्यात काही वावगं आहे का?
सहमत. हा मनुष्याचा सहज-स्वभाव आहे असे वाटते, यात काहीच वावगे नाही.
तेव्हा आमच्या पोरांनी "सांस्कृतिक" कार्यक्रमात नऊवारी नेसली तर विसंगत का दिसाव? आणि महाराष्ट्रातील पोरांनी वापरल तर वावगं दिसू नये अस काही आहे का?
'पोरांनी' नऊवारी नेसली तर नक्कीच विसंगत दिसेल असे वाटते :) (ह. घ्यालच)