दुसरे व पाचवे सूत्र पटले नाही. बाकी पटली. तुमच्या नुदिनीवर प्रतिसाद दिला आहेच. मात्र सर्व शब्दांचे वाचन करण्याएवढा वेळ नव्हता. काही शब्द चांगले आहेत. काही शब्दांना प्रतिशब्द मुळात उपलब्ध असूनही नवे केलेले आहेत, ज्याची गरज नाही असे वाटले. उदाहरणार्थ कॉन्संट साठी स्थिरांक हा शब्द विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात प्रचलीत आहे. त्यासाठी तुम्ही केलेला अध्रुव हा शब्द फारसा आवडला नाही. बोल्ड साठी जाद ऐवजी ठळक हा शब्द जास्त योग्य वाटतो.

असो. बाकी शब्दांबाबतच्या माझ्या सुचवण्या यथावकाश सांगेनच.