करिते का कधी खंत, सरिता करिते का कधी खंत
रांगत लोळत दौडत घोळत
कडेकपारीतूनी खळाळत, आक्रमिते नीज पंथ, सरिता!
कुणी आणिली घागर मृण्मय,
पखाल किंवा कलश हिरण्मय,
पहावया न उसंत, सरिता, विस्तृत चरित दिगंत!