चक्रपाणि,
आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. याने माझे मत बदलेल असे नाही, पण किमान आपल्या लिखाणावर विचार करणे क्रमप्राप्त आहे असे वाटते.
अशा चर्चा थोड्याशा वैचारिक स्वरूपाच्या असल्याने काही लोकांना हे चिखलात दगड मारण्यासारखे वाटते.
त्याला कोण काय करणार?!!
वादग्रस्त विचार मांडण्यात लोकप्रियता घटण्याचा धोका असतो. ज्यांना खरोखर विचारांशी मतलब आहे, अशांनी लोकप्रियतेची फिकीर करू नये. ते करत नाहीतच. बाकी लांगूलचालन करून - इंग्रजीत ज्याला 'प्लेईंग टू दी गॅलरी' असे म्हणतात, ते करून लोकप्रिय रहाणारे लोक सगळीकडेच असतात. 'मनोगत' तरी त्याला अपवाद का असावे? अशांना अपूर्ण उत्क्रांतीचे बळी- व्हिक्टीम्स ऑफ इनकम्प्लीट इव्होल्यूशन- असे म्हणून सोडून द्यावे, असे मला वाटते.
तुमच्या उपक्रमाला मी शुभेच्छा दिल्या आहेतच. पुन्हा एकदा माझा ताडीचा ग्लास उंचावून 'चिअर्स' म्हणतो.
सन्जोप राव